Search

एक विक्षिप्त पुणेकर : गोपाळराव जोशी


पुण्यामध्ये जसे विद्वान, कलाकार, रूढीवादी, सुधारक असे लोक होऊन गेले. त्यामध्ये काही वल्ली सुद्धा होऊन गेल्या. ह्यांच्यात अग्रणी म्हणून गोपाळराव जोशींचे नाव नक्कीच घेता येईल आनंदीबाई जोशींचे पती अशी त्यांची ओळख असली तरी , त्यांचे स्वतःचे एक कलंदर असे व्यक्तिमत्व होते .

आनंदीबाई त्यांच्या दुसऱ्या पत्नी. लहानशा आनंदीला त्यांनी इंग्लिश लिहायला वाचायला शिकविले. एवढेच नाही तर तिला १८८३ मध्ये अमेरिकेला एम.डी . करायला पाठवले. काही मिश्नर्यांशी संधान बांधून त्यांनी हे घडवून आणले .


अमेरिकेत गेल्यावर मात्र आनंदीबाईंना संशय घेणारी घाणेरडी पत्रे लिहून प्रचंड मनस्ताप दिला. त्या काळात आनंदी बाईंना पंडित रमाबाईंनी खूप आधार दिला. त्या काळात त्याही तिथेच होत्या.

मधल्या काळात त्यांनी अग्निहोत्री म्हणून भारतभर प्रवास केला. पोस्टातला हा कारकून कलंदरासारखा भटकत राहिला.

१८२९ मध्ये संगमावर त्यांनी ख्रिस्त धर्मात प्रवेश केला. आणि कहर म्हणजे शेंडी आणि जानवे तसेच ठेवले.

स्वतःचे हसे करून घेण्यात त्यांना फार असे काही वाटले नाही. एक महिन्या नंतर ओंकारेश्वरावर परत हिंदू धर्मात परत प्रवेश केला .


भारतातून आनंदी बाईन ना कळवता थेट अमेरिकेत गेले आणि तेथे हजर झाले. तिथल्या वर्ष भराच्या मुक्कामात त्यांनी स्त्री शिक्षण विरोधात भाषण ठोकले. एकदा तर ख्रिस्ती धर्माच्या विरोधात भाषण केले .

बिचार्या आनंदी बाईंची प्रकृती अगोदरच क्षीण झाली होती. त्यात यांचे वेडाचार. भारतात आनंदीबाईंना घेऊन आल्यावर , एक दोन महिन्यातच आनंदी बाईंचे निधन झाले.


त्या नंतर वासूकाका जोशींनी त्यांना वसतिगृह काढून दिले, ते पण बुडाले. नंतर मद्रासला गेले आणि चित्रांचं एक दुकान काढलं, तेही बंद पडलं.

सगळ्यात मोठा किस्सा म्हणजे एकदा , टिळक, रानडे , वासूकाका जोशी , वगैरे ३०-४० लोकांना पंच हौद मिशन मध्ये चहा पानाला बोलावून दुसऱ्या दिवशी पुण्यातल्या एका व्रुत्तपत्रामध्ये सगळ्या लोकांची नावे छापली . मडमेच्या हातचा चहा बिस्किटे खाल्ली म्हणून छापले. सगळ्याना प्रचंड मनस्ताप झाला. टिळकां सकट बऱ्याच लोकांनी प्रायश्चित्त केले. टिळक त्यांच्या जवळचे असूनहि असला आचारटपणा करून त्यांनी स्वतःची करमणूक करून घेतली.


पुढे नाशिक मध्ये त्यांचे निधन झाले .अशा पुढारलेल्या पण विक्षिप्त माणसाची हि चित्तर कथा .

109 views

Recent Posts

See All

मराठी सरदार घराणी आणि त्यांच्या मूळ व बदलेल्या नाव अथवा आडनावाचा इतिहास

मागच्या लेख मी काही पेशवेकालीन सरदार घराण्यांच्या मूळ आणि बदललेल्या आडनावांचा उल्लेख केला होता. आज शिवकालीन आणि नंतरच्या काळातल्या सरदार आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या मूळ आणि बदलेल्या आडनावांचा इतिहास पाह

9822047304

  • Facebook

©2020 by Pune Memories. Proudly created with Wix.com