पेशवे काळात पुण्यात बर्याचश्या बागा होत्या. रमणबाग , तुळशीबाग , आदम बाग , मोतीबाग , हिराबाग , वगैरे . अशाच एका बागेत , म्हणजे हीराबागेत , पेशव्यांचे एक मोठी बंगलीवजा वास्तू होती.
हीराबागेत अतिशय गर्द झाडी , कारंजी , फुलबागा असल्याची नोंद सापडते . नानासाहेब पेशव्यानी ही बाग त्यांच्या पदरी असलेल्या अनेक नायकिणी पैकी हिरा नावाच्या नायकिणीच्या नावाने ही बाग १७५० मध्ये वसविल्याचे सांगितले जाते .
ही बाग प्रथम " बंगला बाग नावाने ओळखली जात असे ". इथल्या बंगल्याच्या वापर पेशवे त्यांच्या कडे पुण्याला येणाऱ्या सरदारांच्या मुक्कामासाठी , त्याच प्रमाणे रेसिडेंट इंग्रज अधिकारी व इतर इंग्रजांच्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी , मेजवान्यांसाठी केला जात असे.
जनरल वेलस्ली साठी दुसऱ्या बाजीरावाने एक शाही मेजवानी ठेवली होती . जो पुढे ड्यूक ऑफ वेलिंग्टन झाला.
पुढे सवाई माधवरावच्या विवाह प्रसंगी खुद्द निझामाची राहण्याची सोय येथेच केली होती.या प्रसंगी त्याच्यासाठी मोठ्या जेवणाची मेजवानी दिली गेली . बाजी राव खुद्द थोडेसे अंतर ठेवून त्यांची सरबराई करत होता. वापरण्यात आलेली सर्व भांडी , ताटे , वाट्या, पेले चोख चांदीचे होते. पाहुणा तो सर्व डामडौल पाहून चकित झाला, अर्थातच वापरलेली सर्व भांडी नंतर वितळवून दुसऱ्या कामासाठी ही चांदी वापरण्यात आली. हे सर्व म्लेंच्छांच्या (मुसलमानांच्या) स्पर्शाने विटाळलेल्या भांड्यांचा दोष घालवण्यासाठी हे केले गेले.
नाना साहेब पेशव्यानीं काही काळ मस्तानीला येथे नजरकैदेत ठेवले होते. सर्व प्रथम १८३१ मध्ये सोराबजी रतनजी याने ही जागा इंग्रजांकडून विकत घेतली , पुढे ती जागा त्याचा पुतण्या पेस्तनजी यांचेकडे आली . ती त्याने गहाण टाकली , शेवटी , १८७७ मध्ये म्हस्के , रानडे , कुंटे यांच्या पुढाकाराने दीड लाखाला हि जागा विकत घेतली गेली. पुढच्या काळात जस्टीस रानडे , गंगाधर म्हस्के , मरेश्वर कुंटे इत्यादी प्रतिष्ठित पुणेकरांच्या एकमताने , येथे टाऊन हॉल करण्याचे ठरले , व नोव्हेंबर १८९१ मध्ये पुणे टाऊन हॉल कमिटीची स्थापना झाली. याचे नाव "टाऊन हॉल अँड डेक्कन क्लब" असे ठेवण्यात आले. संमेलने, उत्सव, सत्कार समारंभ , भाषणे , अशा सर्व कार्यक्रमांसाठी टाऊन हॉल वापरला जात होता. रायगडावर शीव जन्मोत्सवाचे आयोजन करण्या संबंधीच्या सभा येथेच झाल्या . न्यायमूर्ती रानडयांनी याचे सूतोवाच १८८४ मध्ये प्रथम येथेच केले.
हीराबागेच्या मैदान वरती १८८० ते १८९६ पर्यंत १७ वर्षे वसंत व्याख्यानमाला आयोजित केली जात असे .
पुण्याचा टाऊन हॉल कुठे आहे असे विचारल्यास थोडेच जण बरोबर उत्तर देऊ शकतील , बाकी आपल्याला सर्किट हाऊस , कौन्सिल हॉल , कुठे आहेत हे सांगता येईल पण टाऊन हॉल ची जागा , बहुतेकांना माहिती नसते. हॉटेल अप्सराच्या आणि उद्योग भवन ह्यांच्या मधल्या बोळातून आपण तेथे जाऊ शकतो.
आज टाऊन हॉल च्या जागेवर क्लब उभा आहे, पत्ते , बिलियर्ड्स ,टेबलं टेनिस इत्यादी खेळाची सोय आहे. वास्तूचा काही भाग जुना आहे .
गावातल्या प्रतिष्ठित व उचभ्रु लोकांचा हा एक आवडता क्लब आहे .बहुदा हा क्लब ऑफ महाराष्ट्र चा हा भाग असावा. अशा या ठिकाणाला पुणेकरांनी जरूर भेट द्यावयास हवी.
Disclaimer: Photographs are not taken by me and are only for representational purposes. Original copyrights lie with the owners.
Comments