top of page

विस्मृतीत गेलेला कर्तबगार पुणेकर


आपण मोठं मोठ्या प्रसिद्ध लोकांची नावे वारंवार वाचतो, काही विचारवंत, काही समाजधुरीण, तर काही कलावंत आणि राजकारणी. पण काही भरपूर व उत्तम काम केलेल्या लोकांचा मात्र तेवढा बोल बाला होत नाही .

अशाच एका व्यक्तीबद्दल आपण माहिती करून घेऊ.


नरहर गणपत पवारकाँग्रेस भवन, स.प. महाविद्यालय, सेवा सदन, अनाथ हिंदू महिलाश्रम,आणि प्रभात स्टुडिओ, न्यू इंग्लिश स्कूल चा प्रसिद्ध घुमट अशा अनेक वास्तुंचे निर्माते, आणि शिवाजी हौसिंग सोसायटी च्या आराखडयाचे निर्माते

तसेच बँक ऑफ महाराष्ट्र चे सह संस्थापक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स चे प्रमुख, विधान परिषद सदस्य, एवढ्या सगळ्या संस्थाचे धुरीण. पण आपल्या बहुतेकांना अपरिचित असे हे व्यक्तिमत्व.


प्रभात स्टुडिओच्या बांधकामाचा संपूर्ण आगळ्या वेगळ्या कामाचा मोठा रथ त्यांनी लीलया पेलला.

30-४० एकरावरील या कामात प्रचंड आव्हाने होती, प्रभात रोड व भांडारकर रोड अस्तित्वात नव्हते. अवजड सामान नेणे आणणे महा जिकिरीचे होते. स्टुडिओ, रेकॉर्डिंग रूम, लॅबोरॅटरी, आणि आऊट डोअर locations ची निर्मिती करणे, हे अतिशय आव्हानात्मक काम होते. उरलेल्या सामाना मधून, दामले, धायबर, शांताराम , फत्तेलाल, या प्रभातच्या चार संस्थापकांचे बंगले बांधले गेले.पवारांनी एक बिल्डिंग प्रभात रोड वर बांधली.ती बिल्डिंग आजही मोडकळीला आलेली पण उभी आहे , त्याचे नाव आहे "पवार क्वार्टर्स". तेथे, तंत्रज्ञ, आणि इतर काम करणारे कर्मचारी. यांची राहण्याची सोय असे.

स्वतः पवारांच्या बंगल्या च्या वरच्या मजल्यावर काही दिग्गज मंडळी पुण्यातल्या मुक्कामी राहत असत.

त्यामध्ये देव आनंद , ग. दि . मा., लता मंगेशकर, भालजी पेंढारकर ,सुलोचना. इ. चा समावेश होता.

त्यांचा स्वतःचा बंगला - कमला नेहेरु पार्क जवळ होता.


बँक ऑफ महाराष्ट्र च्या स्थापने मध्ये, जोग, गुप्ते, जोशी , यांच्या बरोबरच चौथे संस्थापक पवार होते .

कित्येक वेळा बँकेचे चेअरमन म्हणून ते प्रभातला द्यायच्या कर्जाचे प्रोपोजल घेऊन तपासणी साठी प्रभात स्टुडिओ मध्ये जायचे .


पवारांनी फर्ग्युसन कॉलेज मधून गणिताची पदवी घेऊन पुढे इंजिनीयरिंग कॉलेज मध्ये त्यांनी सिविल इंजिनीरिंग ची पदवी घेतली आणि एक निष्णात व कुशल इंजिनियर म्हणून अनेक भव्य व देखण्या वास्तूंची निर्मिती करून दाखवली.


शरद पवार एकदा एका सभेत म्हणाले होते " पुण्याने पवारांना काय दिले? " त्या वेळी त्यांचा हा शेरा नरहर गणपत पवारांना उद्देशून होता.


खरोखरीच या नरहर पवारांना पुण्याने एक चांगली ओळख, उल्लेख, प्रशंसा या पैकी भर भरून असे काहीच दिले नाही , असे खेदाने म्हणावे लागेल. अर्थातच पवारांचे प्रसिद्धी पराङ्मुख व्यक्तिमत्व हि त्याला कारणीभूत असू शकेल .

476 views0 comments
bottom of page