top of page

सदाशिव पेठ

Updated: Jun 26, 2020


महारावांनी त्यांच्या वाड्यापासून सुरु केलेल्या आणि नंतर सतीश काणे यांनी उत्कृष्ट पणे विस्तारलेल्या सदाशिव पेठेच्या समृद्ध वारशा ची लेखमाला थोड्या काळात बरीच लोकप्रिय झाली आहे.

मी स्वतः सदाशिव पेठेतच राहिल्याने ती खूपच भावली.

या लेखमालेत जवळ जवळ पेठेच्या पूर्ण धांडोळा घेतल्यावर, थोडेसे दुवे आले नाहीत असे वाटले.

खालील काही वस्तू , व्यक्ती , संस्था पुरेशा अधोरेखित व्हाव्या म्हणून हा छोटासा लेखन प्रपंच.

विंचूरकर वाडा :- लोकमान्य टिळकांचे १४ वर्षांचे वास्तव्य - पुण्याचा सार्वजनिक गणपतीचा पहिला साक्षीदार आणि टिळक व स्वामी विवेकानंदांची भेट झालेला हा वाडा - सदाशिव पोस्ट ऑफिस ला तिरकस समोर आहे.




सदाशिव पोस्ट ऑफिस च्या पहिल्या मजल्यावर लागू बंधूंची मोत्याची पेढी होती

( व विवेक लागू - रीमा लागूंचे यजमान तिथेच राहत). त्याच्या पुढे दोन वाडे सोडल्यावर तबला नवाझ सामंत यांचे तबल्याचे क्लास होते. विंचूरकर वाड्या समोर प्रसिद्ध गिर्यारोहिका उष:प्रभा पागे राहायच्या. त्या आकाशवाणीची संचालिका होत्या. गिर्या रोहण प्रेमापायी त्यांनीं लडाख मध्ये बदली करून घेतली होती.


याच रस्त्यावर मागे चितळे सदन मध्ये चितळ्यांनी दूध व्यवसायाची सुरवात केली. शिव संतोष दुग्धालय हे त्या दुग्धालयाचे नाव. एक रस्ता मागे आल्यावर बॅरिस्टर गाडगीळ पथावर लेखक म .श्री . दीक्षित राहायचे.

बॅरिस्टर गाडगीळ रस्त्यावरच चौक ओलांडल्यावर , पुढे विश्राम बौग वाड्याच्या जवळ, प्राध्यापक ग .प्र . प्रधान राहत. त्याच्या समोरच चितळ्यांचे इतर पदार्थ तयार करत.


ह्याच्या समांतर रास्ता म्हणजे ज्ञान प्रबोधिनी ते नागनाथ पार रस्ता. येथे फाटक गुरुजींची वेदपाठशाळा होती. त्याच्या शेजारी डॉ . ज्योत्स्ना इनामदार म्हणजे आताच्या ज्योत्स्ना पडळकर -या प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ या राहत असत. त्यांच्या यजमानांच्या भगिनी अलका पडळकर या नितु मांडके च्या पत्नी. नितु मांडके यांचे नाव अशोक मांडके असे होते , नंतर त्यांचे गुरु संप्रसाद विनोद यांनी त्यांचे नाव- नित्यनाथ ठेवले असे सांगतात.



मागे आल्यावर ब्राह्मण कार्यालयासमोर आमचा सावंतांचा वाडा.

माझ्या वाड्यातून रवी अभ्यंकर -उप संचालक D.S.I.R दिल्ली.

शिशिर प्रधान - हेक्सट फार्मा - प्रोजेक्ट हेड

डॉ रमेश डुंबरे - वरिष्ठ शल्य चिकित्सक - रुबी हॉल आणि दीनानाथ हास्पिटल

डॉ स्वाती अनपट - स्त्री रोग चिकित्सक व तज्ञ

मी स्वतः (रणजीत घाटगे) - व्हाईस प्रेसिडेंट - सँडविक आशिया इत्यादी बडी मंडळी झाली.

पुढच्या भावे स्कूल चौकात डॉ वैजयंती खानविलकर (प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ राहत असत).

तिथेच जवळ सदू शिन्दे क्रिकेटर व शरद पवारांची सासुरवाडी.


जवळच चौकात गुर्जरांच्या प्रेस होता. आणखी एक प्रसिद्ध स्थान म्हणजे नाना आगाशांचे गणित क्लास.

त्यांच्या शेजारी गोपीनाथ तळवलकर राहत - बालसाहित्य व आकाशवाणीच्या. बालोद्यान चे नाना सदाशिव पेठतली आजून काही दिग्गज मंडळी म्हणजे पंतांच्या गोटात - न्यू इंग्लिश स्कूल समोर ग . दि . माडगूळकर वारंवार राहत असत. त्यांच्या समोर टिळक रोड वर सुधीर फडक्यांचे "चित्रकुटी " . पुण्यात आल्यावर फडके तेथेच राहत.


पुढे चिमण बागेत राजा परांजपे व जवळच शरद तळवलकर राहत. तिथून पुढे स. प. कॉलेज च्या जवळ स्मिता पाटील.अशी दिग्गज नाट्य चित्र सृष्टीतली अधिराज्य करणारी मंडळी. S.P. College च्या बोळात मोहन धारिया राहत असत. पुढे टिळक स्मारक मंदिरात जगन्नाथ महाराज पंडित ह्यांचे घर होते.



अजून एक मोठा क्लस्टर - स्काऊट ग्राउंड चा परिसर. उद्यान प्रसाद च्या पुढच्या गल्लीत चित्तरंजन कोल्हटकर - अनाथ विद्यार्थी ग्रहाचे डॉ .कोशे तसेच ग .श्री . खैर

भिकारदास मारुती जवळ जादूगार रघुवीर ह्यांचा बंगला. पायोनियर डायिंग हौस च्या समोरचा गल्लीत ज्येष्ठ लेखक श्री . म . माटे -. य . गॊ जोशी प्रकाशक. जवळच नातू बागेपाशी विनोदी लेखक चीं.वि जोशी. अनाथ विद्यार्थी ग्रहाच्याच जवळ - पंडित वसंतराव देशपांडे. मुलांच्या भावे स्कूल च्या मागे ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, आणि तिथून पुढे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर .


पेरू गेट च्या चौका पुढे (ह्या गेटचे खरे नाव व्हिक्टर पेरॉन ह्या लढवैय्या च्या आदरार्थी ठेवले होते असे म्हणतात).

सरोजिनी बाबर - लोक साहित्याच्या कवयित्री आणि विपुल लेखिका.

रोहिणी हट्टंगडी (ओक) ह्या ब्रिटिश फिल्म आणि टेलिव्हिजन (बॅफ्टा) चे पारितोषिक मिळवणारी एकमेव अभिनेत्री आहे (कस्तुरबांचा गांधींचा सिनेमातील रोल)




शनी पाराच्या समोर राहणाऱ्या भारतातील प्रथम स्त्री डॉक्टर सौ आनंदीबाई जोशी ह्यांचे घर होते.

आणि भाऊ महाराज बोळात रहाणारे नाना भावे आणि राया भावे - पटवर्धन म्हणजेच , वाडेश्वर , कृष्णा डायनींग आणि प्रसन्न ट्रॅव्हल्स चे संचालक.



जाता जाता, माझे ज्योतिष गुरु व. दा . भट व ज्योतिषातले उत्तम शिक्षक लेखक व एक वस्तुनिष्ठ शास्त्रज्ञ ह्यांचे पुणे विद्यार्थी ग्रहा समोरचे घर माझ्या डोळ्या समोर आहे. निंबाळकर तालमी जवळ डॉ एस.वि गोखले राहत. सवाई गंधर्व महोत्सवाचे संयोजन करण्यात महत्त्वाचा सहभाग असणारे हे हृदय विकार तज्ज्ञ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ . प्रभाताई गोखले हे कलासक्त दाम्पत्य.


तसेच स्वामी स्वरूपानंदांचे निस्सीम भक्त व त्यांचे एक उत्तराधिकारी माधवनाथ महाराज म्हणजे पूर्वाश्रमीचे (शेडगे अळी जवळील )कीर्ती क्लाथ स्टोरचे मालक -श्री वाकडे ह्यांचा उल्लेख करणे महत्वाचे आहे.


त्याप्रमाणेच काही मोठ्या संस्था जसे, अप्पा पेंडसे यांची ज्ञान प्रबोधिनी.

गीता धर्म मंडळ -पेरू गेट जवळ

वेद शास्त्रोत्तेजक संस्था

टी .म .वि समोरील महाराष्ट्र ग्रंथोतेजक चळवळ ( शंभरी च्या आसपास )

अष्टांग आयुर्वेद संस्था

ट्रेनिंग कॉलेज शिक्षक व शिक्षण विषयी ज्ञान देणारी संस्था.


या लेखन प्रपंचाचा हेतू आधीच्या लेखातल्या त्रुटी काढण्याचा नसून, अनवधानाने राहिलेल्या गोष्टीं चा नाम निर्देश करण्याचा आहे. काही ठिकाणी रस्त्यांचे नॅव्हिगेशन मागे पुढे झाले आहे त्या साठी क्षमा असावी. त्याच प्रमाणे नकळ्त झालेली पुनरावृत्ती व काही तपशिलात अचूकता कमी जास्त असण्याची शक्यता असू शकेल.

मी स्वतः चांगला शब्दकार आणि लेखक तर मुळीच नाही, तरीही सदाशिव पेठेतील रहिवासी आणि प्रेमी असल्याने हा केलेला एक प्रयत्न गोड करुन घ्यावा.

174 views1 comment

1 Comment


hrpendse
Jun 23, 2020

लेखात उल्लेखलेली सदाशिव पेठेच्या समृद्ध वारशा ची लेखमाला कुठे वाचायला मिळेल

Like
bottom of page