top of page

तांबट आळी

ब्रह्मदेवाच्या विश्व निर्मितीचे काम मूर्त स्वरूपात आणण्याचे काम त्याचा , रचनाकार, स्थापत्यकार , वास्तुशिल्पी , वगैरे अनंत विद्यांचा सर्वे सर्वा असा विश्वकर्मा याने केले . त्याच्या काही पुत्रांपासून विविध व्यावसायिकांचा जन्म झाला. त्यात मनू ( लोहारकाम) दैवज्ञ ( सोनार ) शिल्पी ( दगड काम ) , त्वष्टा ( धातू काम )आणि मय( वास्तू कला ) हे ते पाच मुलगे होत .

त्याचा पुत्र त्वष्टा हा तांबट लोकांचा जनक .


कास्य धातूपासून निरनिराळ्या वस्तू बनविणाऱ्या या कारागिरांना "कासार "असे म्हणतात आणित्यांच्या समाजाला

"त्वष्टा कासार समाज" असे म्हणले जाते. यांच्यात जीनगरी ( पितळ) , व तांबट ( तांब्याचे काम )असे उप भेद आहेत. कासार हा रूढार्थी. कास्य किंवा ब्रॉन्झ याच्याशी निगडित असला तरी हे लोक , तांबे , पितळ ,कास्य ( कास्य पदक किंवा ब्रॉन्झ मेडल ) या सर्व धातूंचे काम करण्यात निपुण आहेत .पूर्वीच्या काळात मधुर नादाच्या मोठ्या घंटांचे निर्माण कार्य हाच समाज करीत असे . आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्यातले जंतू मारण्याचे तसेच ऍसिडिटी कमी करण्याचे गुणधर्म आहेत . त्याचप्रमाणे पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे . म्हणूनच पूर्वी नदीच्या पात्रात तांब्याची नाणी टाकण्याची पद्धत होती .


Tambat Ali

असे हे तांबट सुमारे १७ व्या शतकात , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , आणि कोकणपट्टी मधून पुण्यात आले.यांचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या पासून तोफ गोळ्या ची आणि इतर शस्त्रांची निर्मिती करत .

वेद काळात , गदा , मुकुट , इत्यादी बनवत असत असे म्हणले जाते .

नंतरच्या काळात मात्र यांनी भांड्यांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. धातूवरील बारीक नक्षीकाम हे पण त्यांचेच कसब !घंगाळी, डेचक्या , तपेली , तांब्ये , पूजेची उपकरणे इत्यादी हाताने ओतून , घडवून , ठोके देऊन ( हॅमर टोनिंग ) त्याची उत्कृष्ट उपकरणे बनवणे हा यांचा व्यवसाय होता . कसबा पेठेच्या अगदी जवळच , पवळे चौकाजवळ यांची वस्ती होती , त्या जागी अगोदर , सोनार व ब्राम्हण राहत असत .या सर्व कारागिरांच्या व्यवसायांवरून त्यांच्या वस्त्यांची नावे पडली .आधुनिक भांड्यांचा अविष्कार

वानगी दाखल , शिंपी आळी , भोई आळी , फणी आळी , तांबट आळी , कासार आळी , लोणारआळी , इत्यादी .

पूर्वापार यांची घरे बसकी , एक मजली , कौलाचे किंवा पत्र्याचे छत अशा तर्हेची आणि अरुंद बोळात असत. कामाच्या जागेतच वरच्या मजल्यावर अथवा मागच्या खोल्यां मध्ये ह्यांचे घर असे .
आजही येथे जाण्यासाठी असंख्य , बोळ , गल्ल्या , गटारे , तुडवत जावे लागते .

कायम ठोके मारणाऱ्या कारागिरांचा ठकठकाट , भट्ट्या मधून बाहेर पडणारे धूर , लेथ मशीनचा घराघराट , अशा संमिश्र आवाजाची आणि वासाची सरमिसळ असे वातावरण इथे बघावयास मिळते. उत्कृष्ठ देशी घाटाची भांडी , आकर्षक पितळेचे जुन्या डिझाईनचे दिवे , चकचकीत आणि झळझळीत उपकरणे मनाला भुरळ न पाडतील तरच आश्चर्य.


प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टील च्या वाढत्या उपयोगामुळे व इंपोर्टेड कमी कसाच्या वस्तूंपुढे ह्याधंद्याला उतरती कळा लागली, याचा उल्लेख १८८५ च्या गॅझेटियर मध्ये सुद्धा आहे . पण अलीकडच्या अँटिक इंटेरिअर्स मध्ये जोरदार वापर सुरु झाल्यावर या धंद्याला बरकत येऊ लागली आहे . तांब्याची घंगाळी , पितळेचे लामण दिवे , तांब्याचे बंब , कॉपर बॉटल्स , ठोक्याची छोटी वाढायची भांडी यांचा वापर मुक्त हस्ते वापरण्याची फॅशन सध्या "अगदी इन " आहे.पण तरीही ही हस्त कला हळू हळू लयास जाऊ लागली आहे. भालचंद्र कडू यांच्या सारख्या कसबी कारागिराने किमान एक हजार लोकांना हि कला शिकविण्याचा विडा उचललेला आहे .

स्वतः भालचंद्र कडू आठव्या पिढीतील तांबट असून त्यांनी २ महिने अमेरिकेतल्या येल , आणि ऍरिझोना विद्यापीठात या कलेचे त्यांनी शिक्षण दिले आहे. प्रगतिशील विचारांच्या भालचंद्र कडूनी गेली ३० वर्षे नव नवीन वस्तू निर्माण करण्यात घालवलीआहेत .


त्यांच्या नुसार उत्कृष्ठ ठोके मारणारे जेम तेम १०-१२ लोक राहिले आहेत. या ठोके मारण्याच्या कामाला "मठार काम" असे म्हणतात. आता हा धंदा पसरत पसरत बोहरी आळीतल्या भांडे अळी पर्यंत पोचला आहे .

पंच तारांकित रिसॉर्ट्स मध्ये दिसणाऱ्या या आकर्षक वस्तूंचे निर्माते मात्र बरेचसे तशाच. दाटीवाटीच्या पेठात धुरकट वातावरणात , आणि धोकेदायक मेटल डस्ट मध्ये , आगीच्या धगीत , ऍसिड मध्ये कुठल्याही पर्सनल प्रोटेक्टिव्ह उपकरणा शिवाय काम करत आहेत .पुढच्या वेळी तांब्याच्या ताम्हनांचा, काश्याच्या थाळ्यांचा, हॉटेलातल्या ठोक्याच्या तांब्यांच्या भांड्यांचा वापर करताना या पाठच्या कारागिरांची आठवण जरूर ठेवा .

तसेच एकदा या आकर्षक वस्तूंच्या निर्मिती कारागिरांच्या आळीला जरूर भेट द्या .

INTACH ही प्रसिद्ध संस्था ह्या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी ( Revival ) भरपूर काम करीत आहे .

पण या समाजातली तरुण पिढी मात्र या कलेकडे पूर्ण पाने पाठ फिरवून इतर जीवनोपयोगी शिक्षणघेत आहे .

उत्कृष्ठ अशा एका हस्त कलेचा लोप होत चालल्याची हुरहूर आणि दुःख मात्र खूपच अस्वस्थ करणारी आहे .Photographs are not taken by me. Copyrights belong to original owners of the photographs.

129 views0 comments
bottom of page